केंद्रीय अर्थसंकल्पातून महाराष्ट्राला काय मिळालं, असा सवाल आमदार आदित्य ठाकरेंकडून उपस्थित करण्यात आला होता. त्यावर भाजपाचे आमदार अतुल भातखळकर यांनी आदित्य ठाकरेंना बजेट कळत नाही, असा खोचक टोला लगावला आहे. तर कोस्टल रोडसाठी लागणाऱ्या परवानग्या केंद्राकडूनच मिळाल्या याची आठवणही त्यांनी करून दिली.