चिंचवड हा भाजपाचा बालेकिल्ला आहे. तिथे भाजपा निर्विवाद विजयी होईल. दिवंगत आमदार लक्ष्मण जगताप यांचं अपूर्ण स्वप्न पूर्ण करण्यासाठी अश्विनी जगताप यांना मतदार निवडून देतील, असा विश्वास भाजपाचे मंत्री गिरीश महाजन यांनी व्यक्त केला आहे. गिरीश महाराज यांनी अश्विनी जगताप यांना उमेदवारी जाहीर झाल्यानंतर पिंपळे गुरव येथील त्यांच्या निवासस्थानी येऊन भेट घेतली. तसंच भाजपा कसबा पेठ आणि चिंचवड विधानसभा पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी आग्रही आहे, असं देखील त्यांनी यावेळी नमूद केलं.