काँग्रेस आमदार प्रज्ञा सातव या कळमनुरी तालुक्यातील कसबे दवंडा या गावात आल्या असता एका अज्ञात व्यक्तीने त्यांच्यावर हल्ला केला. यावर राजकीय वर्तुळातून अनेक प्रतिक्रिया उमटत आहे. या पार्श्वभूमीवर शिवसेना ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी झालेला हल्ला हा अत्यंत दुर्दैवी असल्याचं म्हणत तीव्र शब्दांत निषेध व्यक्त केला आहे. या हल्ल्यामुळे एकूणच महिलांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला असून गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या संदर्भात कडक कारवाई करण्याची मागणी अंधारेंनी केली आहे.