केंद्रीय निवडणुक आयोगाने दिलेल्या निकालानंतर राज्यातील राजकारण तापलं आहे. निर्णयाविरोधात ठाकरे गटाकडून शिंदे आणि मोदी सरकारवर टीकास्त्र डागलं जात आहे. ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी देखील या निकालावरून निवडणूक आयोग आणि सत्ताधाऱ्यांवर शंका उस्थित केली आहे. तर आगामी निवडणुकीत लोक आपलं उत्तर बॅलेट बॅाक्समधून देतील, असंही त्या म्हणाल्या.