विधिमंडळ अर्थसंकल्पिय अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला आयोजित पत्रकार परिषदेतून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी विविध विषयांवर भाष्य करत विरोधकांनी केलेल्या टीकेला देखील प्रत्युत्तर दिलं. मुख्यमंत्र्यांनी तर थेट पहाटेच्या शपथविधीचा उल्लेख करत विरोधी पक्षनेते अजित पवारांवर निशाणा साधला. एकनाथ शिंदेंनी निष्ठा बदलली अशी टीका होत आहे. मग मी असं म्हणावं का की अजित पवारांनी त्यादिवशी दिवसातून तीन वेळा आधी फडणवीसांसह शपथविधी केला नंतर पुन्हा राष्ट्रवादीत गेले, असा टोला शिंदेंनी लगावला.