मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे बंडाआधी मातोश्रीवर येऊन रडले होते, असा दावा आमदार आदित्य ठाकरेंनी केला आहे. या पार्श्वभूमीवर आता शिंदे गटाकडून प्रतिक्रिया येत आहेत. शिवसेनेचे (शिंदे गट) प्रवक्ते नरेश म्हसके यांनी पत्रकार परिषद घेत आदित्य ठाकरे आणि उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला आहे. एकनाथ शिंदे गुवाहटी आणि सुरतला असताना उद्धव ठाकरेंचाही फोन आला होता, असा पलटवार नरेश म्हस्केंनी केला आहे.