आपली खासदारकी रद्द झाल्यानंतर राहुल गांधींनी पत्रकार परिषद घेतली होती. त्यात त्यांनी आपण माफी मागायला सावरकर नाही, माझं नाव गांधी आहे, असं विधान केलं होतं. त्यावरून भाजपा आणि शिंदे गट आक्रमक झाल्याचं पाहायला मिळत आहे. सावरकरांच्या अवमान प्रकरणावरून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राहुल गांधींना सुनावलं. सावरकर होण्याची तुमची लायकी नाही. सावरकरांचा त्याग तुमच्यामध्ये नाही, अशी टीका शिंदेंनी केली. पत्रकार परिषदेत ते बोलत होते.