साई रिसॉर्ट प्रकरणी उद्योजक सदानंद कदम यांना ईडीने अटक केली आहे. तर ठाकरे गटाचे नेते अनिल परब यांचे ते व्यावसायिक भागिदार आहेत. ईडीकडून विरोधकांवर केल्या जाणाऱ्या या कारवाईवरून ठाकरे गट आक्रमक झाल्याचं पाहायला मिळत आहे. ईडी चुकीच्या पद्धतीने कारवाई करत आहे. त्या विरोधात न्यायालयामध्ये धाव घेणार असल्याची माहिती ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी दिली आहे #sushmaandhare #shivsena #sadanandkadam #udhavthakkarey