राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि सत्तेतील काही मंत्री काही दिवसांपूर्वी अयोध्येमध्ये जाऊन आले. त्यानंतर राज्याच्या राजकीय वर्तुळात आरोप-प्रत्यारोपांचं राजकारण रंगल्याचं पाहायला मिळत आहे. या पार्श्वबूमीवर भाजपा नेते आणि कॅबिनेट मंत्री चंद्रकांत पाटील यांनी बाबरी पाडल्यासंदर्भात केलेल्या वक्तव्यावरून सत्ताधारी भाजपा-शिंदे गट आणि ठाकरे गट यांच्यात खडाजंगी सुरू झाली आहे. ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी यावरून एकीकडे भाजपाला लक्ष्य केलं असताना दुसरीकडे त्यांनी शिंदे गटावर परखड शब्दांत निशाणा साधला आहे.