अदाणी प्रकरणाची चौकशी व्हावी, असं मत शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी लोकसत्ताच्या लोकसंवाद या क्रार्यक्रमात बोलताना व्यक्त केलं. या प्रकरणात जेपीसी चौकशी का महत्त्वाची आहे यावर त्यांनी भाष्य केलं. लोकसंवाद उपक्रमाच्या चौथ्या कार्यक्रमात उद्धव ठाकरे यांनी राज्यातील सध्याच्या राजकीय परिस्थितीवर भाष्य केलं. तसंच शिवसेनेतील बंड, ठाकरे गटाची भविष्यातील वाटचाल यावरही त्यांनी भूमिका स्पष्ट केली.