नागपूरसह विदर्भातील शुक्रवारच्या महत्त्वाच्या घडामोडी I Live Marathi News | आजच्या ठळक बातम्या |

Sakal 2021-04-28

Views 1.4K

नागपूर : गेल्या दीड दशकापासून शहरातील विविध कार्यक्रमातून आपल्या आवाजाने नागपूरकरांची मने जिंकणारा तरुण गायक विजय चिवंडे यांचा आज सकाळी कोरोनाने मृत्यू झाला. तीन दिवसांपासून ते मेयोमध्ये उपचार घेत होते. त्यांच्या निधनाने संगीत क्षेत्रातील व्यक्तिंनी व त्यांच्या चाहत्यांनी हळहळ व्यक्त केली.

गडचिरोली : भामरागड उपविभागीय पोलिस अधिकारी कार्यालयाअंतर्गत येणाऱ्या कोठी पोलिस मदत केंद्रात किराणा साहित्य आणण्यासाठी दुकानात गेलेल्या दोन जवानांवर नक्षलवाद्यांनी अचानक गोळीबार करीत केलेल्या हल्ल्यात एक पोलिस जवान शहीद झाला असून, दुसरा जखमी झाला आहे. ही घटना देशाच्या स्वातंत्र्यदिनाच्या आदल्या दिवशी शुक्रवारी (ता. १४) सकाळी ८ ते ८.३० वाजताच्या सुमारास घडली. या घटनेत शहीद झालेल्या जवानाचे नाव दुशांत नंदेश्‍वर असे आहे. तर जखमी जवानाचे नाव दिनेश भोसले आहे.

नागपूर : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी राज्यातील जीम सुरू करण्याची मागणी सरकारकडे केली होती. त्यांची ती मागणी रास्तच होती, असे बहुजन विकास मंत्री विजय वडेट्टीवार आज म्हणाले. येत्या दोन दिवसांत जीम सुरू होतील, अशी माहिती त्यांनी दिली. जनतेच्या आरोग्यासाठी आणि एक व्यवसाय म्हणून जीम संचालकांच्या दृष्टीनेही जीम सुरू होणे गरजेचे आहे. जीम सुरू करण्याबाबतच्या फाईलवर माझी सही झालेली आहे, एक-दोन दिवसांत मुख्यमंत्र्यांची देखील सही त्यावर होईल आणि त्यानंतर ताबडतोब जीम सुरू केले जातील, असंही त्यांनी वडेट्टीवार म्हणाले

नागपूर : आयुक्त तुकाराम मुंढे यांनी १८ ऑगस्टपर्यंत कोरोना चाचणी करण्याचे फतवा काढल्यानंतर तपासणीसाठी चाचणी केंद्रावर गेलेले व्यापारी व त्यांच्या कर्मचाऱ्यांना किट उपलब्ध नसल्याच्या कारणावरून परत पाठविण्यात आले. त्यामुळे व्यापाऱ्यांनी ‘आधी कोरोना चाचणीची सुविधा द्या, मग धमकी द्या‘, असा सूर लावला आहे. आयुक्तांच्या निर्णयाचे स्वागत आहे, परंतु आयुक्तांनी वास्तव्याचेही भान ठेवण्याची गरज व्यक्त करीत काही व्यापाऱ्यांनी संताप व्यक्त केला.

नागपूर : राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढल्याने त्याचा परिणाम यावर्षी स्वातंत्र्यदिनाच्या उत्सवावर होणार आहे. राज्यशासनाने काढलेल्या नियमावलीमु?

Share This Video


Download

  
Report form
RELATED VIDEOS