नागपूर : अनेकदा ऑनलाइन ॲपमध्ये दाखविण्यात आलेली जागा प्रत्यक्षात वेगळीच असल्याचे दिसून येते. या प्रकाराने रिअल इस्टेटमधील व्यवहार करताना अत्यंत सावधानता बाळगावी लागते. यावर उपाय म्हणून रायसोनी अभियांत्रिकी महाविद्यालयातील मयूर माटे या मेकॅनिकल शाखेतील अंतिम वर्षाच्या विद्यार्थ्याने ‘खसरा’ संकल्पना मांडली आहे. यामुळे शहरात खरेदी-विक्रीचे व्यवहार सुलभ होतील. यासाठी केवळ ॲपच नव्हे तर मयूरने संकेतस्थळ ही विकसित केले आहे. लवकरच त्याची ही संकल्पना मूर्त स्वरूपात येणार असून ते प्ले-स्टोअरवर टाकण्यात येणार आहे.
नागपूर : महामेट्रोचा विस्तार नागपूरच्या जवळच्या शहरांना जोडण्यासाठी पॅसेंजर ट्रेनऐवजी वातानुकूलित मेट्रोने जोडण्याच्या प्रकल्पाला राज्य मंत्रिमंडळाने मंजुरी दिली. नागपूरपासून जवळ असलेल्या नरखेड, भंडारा, वर्धा व रामटेक ही शहरे मेट्रोने जोडली जाणार आहेत. यात नागपूर ते नरखेड या ८५.५३ किलोमीटर मार्गाचा समावेश आहे. या दरम्यान ११ स्थानके राहणार आहेत. केंद्र सरकारच्या संदर्भात असलेल्या या प्रकल्पासाठी राज्य मंत्रिमंडळाची परवानगीही तत्कालीन सरकारने घेतली नव्हती. या प्रकल्पाला आज रितसर राज्य मंत्रिमंडळाची मंजुरी मिळाल्याने या प्रकल्पात असलेल्या सर्व अडचणी दूर झाल्या आहेत.
नागपूर : राज्याच्या जवळपास सर्वच जिल्ह्यांतील एसपींच्या बदल्या झालेल्या आहेत. मुदत उलटून गेलेल्या ज्या जिल्ह्यांमधील अधीक्षकांच्या बदल्या झालेल्या नाहीत, त्यामध्ये नागपूर जिल्ह्याचे पोलिस अधीक्षक राकेश ओला यांचा समावेश आहे. गृहमंत्री अनिल देशमुख यांच्याच जिल्ह्यातील एसपींची बदली रखडल्यामुळे यामागे काही राजकारण तर होत नाही ना, अशी चर्चा सुरू झाली आहे. गृहमंत्री अनिल देशमुख आणि पशुसंवर्धन मंत्री सुनील केदार यांच्यामध्ये जिल्ह्यात कुणाला आणायचे, यावर एकमत होत नाहीये, असेही सूत्र सांगतात.
यवतमाळ : विविध भागात दुर्गोत्सवाची जय्यत तयारी सुरू झाली आहे. या दुर्गोत्सवाचे दर्शन जगभरातील भाविकांना व्हावे, म्हणून तरुण चंद्रेश सेता यांनी ’यवतमाळ नवरात्री डॉट कॉम’या नावाची वेबसाइटच तयार केली आहे. या माध्यमातून यवतमाळच्या दुर्गोत्सव सातासमुद्रापार पोहोचला आहे. या वेबसाइटवर 2015 ते 2019 च्या