नागपूर : गेल्या १४० वर्षांच्या इतिहासात प्रथमच पिवळी मारबतीनिमित्त निघणारी मिरवणूक रद्द करण्यात आली आहे. साथरोग प्रतिबंधक कायद्यामुळे केवळ दहनाची परवानगी मागण्यात आली असली तरी नागरिकांच्या संभाव्य गर्दीमुळे परवानगी मिळण्याची शक्यता कमी असल्याने यंदा मारबतही विलगीकरणातच राहणार असल्याचे चिन्हे दिसत आहे.
नागपूर : महापालिकेची आर्थिक स्थिती वाईट आहे. त्यामुळे नुकताच काही कंत्राटी अभियंत्यांचा कार्यकाळ संपुष्टात आला. त्यांना मुदतवाढ दिली नाही. अशाच प्रकारे कंत्राटी पद्धतीने काम करणाऱ्यांना नियमित करणार नाही, असे नमुद करीत आयुक्त तुकाराम मुंढे यांनी कंत्राटदार कंपन्यांना पालिकेतून बाहेर करण्याचे संकेत दिले आहे.
नागपूर : विदर्भ, परभणी आणि जळगाव या तीन विभागात शिल्लक कापसाची खरेदी या आठवड्यात पूर्ण होण्याची शक्यता आहे. त्यानंतर कापूस खरेदी बंद केली जाईल, अशी माहिती महाराष्ट्र राज्य सहकारी कापूस उत्पादक पणन महासंघाचे अध्यक्ष अनंतराव देशमुख यांनी दिली.
यवतमाळ : शहरात अखेर लॉकडाउनमध्ये शिथिलता आल्यावर काही प्रमाणात हाताला काम मिळाले. त्यातही अनियमितता असल्याने मजुरांच्या हाती पैसा नाही. कोरोनापेक्षा आता लॉकडाउनची जास्त भीती वाटते, अशी प्रतिक्रिया कामगारांकडून व्यक्त होत आहे.
चंद्रपूर : कोरपना तालुका कुपोषणमुक्त करण्याचा ध्यास घेऊन 'जाणीव माणुसकीची' अभियानाचा प्रारंभ नांदा येथे तालुका बालविकास अधिकारी गणेश जाधव यांच्या हस्ते करण्यात आला. उपक्रमांतर्गत कोरपना तालुक्यातील ४६ मध्यम व १४ तीव्र अशा एकूण ६० कुपोषित बालकांना पोषण आहार किट तसेच मोफत आरोग्य कार्डचे वितरण करण्यात आले.
#Nagpur #NagpurNews #Vidarbha #VidarbhaNews #News #SakalNews #Sakal #MarathiNews #Amravati #Yavatmal #Bhandara #Gondia #Chandrapur #Gadchiroli #Wardha
Sakal Media Group is the largest independently owned Media Business in Maharashtra, India. Headquartered in Pune, Sakal operations span across newspapers, TV (SAAM TV), magazines, Internet, and Mobile. With a heritage of over 82 years Sakal Media Group Publishes the number 1 Marathi Newspaper in Maharashtra and also owns and operates its TV channel named SAAM TV.