नागपूरसह विदर्भातील गुरुवारच्या महत्त्वाच्या घडामोडी | Live Marathi News | आजच्या ठळक बातम्या |

Sakal 2021-04-28

Views 1.6K

नागपूर : कृषिप्रधान म्हणवणाऱ्या देशात शेतकऱ्यांसाठी शेतकरी न्याय प्राधिकरणसारखा कोणताच कायदा नाही. भारतीय दंड विधान ही वेगळी स्वतंत्र संहिता असताना मुंबई पोलिस कायदाही आहे. त्याच धर्तीवर आता शेतकरी न्याय प्राधिकरण स्थापन करण्यात येणार आहे. गेल्या आठवड्यात या संदर्भात पहिली बैठक झाली. त्याचा अहवाल लवकरच सादर केला जाणार आहे, अशी माहिती महाराष्ट्राचे विधानसभा अध्यक्ष नाना पटोले यांनी दिली आहे.

नागपूर : शिवसेनेत आता काँग्रेसचं कल्चर बघायला मिळत आहे. उच्चशिक्षित नेत्यांच्या आगमानमुळे शिवसैनिकांच्या बैठका आता शिवसेना भवनात नाही तर बंगल्यात होऊ लागल्या आहेत. शिवसेनेतही काँग्रेसी कल्चरचा शिरकाव होऊ लागला आहे. त्यामुळे नागपुरातील निष्ठावंत शिवसैनिकांमध्ये अस्वस्थता आहे. शिवसेनेचे आमदार आणि नागपूर शहराचे नवनियुक्त संपर्क प्रमुख दुष्यंत चतुर्वेदी यांनी दोन दिवस शहरातील सर्व सहा विधानसभा मतदारसंघांच्या आढावा बैठकी त्यांच्या बंगल्यात घेतल्या. सर्व पदाधिकाऱ्यांची ओळख तसंच महापालिकेच्या निवडणुकीबाबत चर्चा यात करण्यात आली. बैठकीला सर्वच आजी-माजी पदाधिकाऱ्यांनी हजेरी लावली होती.

वर्धा : गावात पोषण सुरक्षा टिकावी आणि सर्वांना विषमुक्‍त भाजीपाला मिळावा यासाठी उमेद प्रकल्पांतर्गत माझी परसबाग अभियान राबवण्यात आले आहे. वर्धा आणि यवतमाळ जिल्ह्यात बियाण्यांच्या कीट वितरित करण्यात आल्या आहेत. यात एका परसबागेत भाजीपाल्याच्या २० वाणांचे उत्पादन घेण्यात येणार आहे. वर्धा जिल्ह्यातल्या आठही तालुक्‍यात ३२० गावांत वैयक्तिक आणि सामूहिक परसबागेची निर्मिती झाली आहे.

यवतमाळ : जिल्ह्यात बकरी ईदच्या बंदोबस्तासाठी आलेले नागपूर येथील राज्य राखीव दलाचे ५९ जवान कोरोना पॉझिटिव्ह निघाले आहे. बंदोबस्त आटोपून नागपूरला गेल्यावर त्यांची तपासणी करण्यात आली. त्यात हे वास्तव समोर आले. नुकत्याच पार पडलेल्या बकरी ईदसाठी नागपूरहून SRPF जवानांची तुकडी यवतमाळ जिल्ह्यात बंदोबस्तासाठी आली होती. बंदोबस्त आटोपून नागपूर येथे गेल्यावर सर्वांची कोरोना टेस्ट करण्यात आली. त्यात हे जवान कोरोना पॉझिटिव्ह निघाले आहेत.

#Nagpur #NagpurNews #Vidarbha #VidarbhaNews #News #SakalNews #Sakal #MarathiNews #Amravati #Yavatmal #Bhandara #Gondia #Chandrapur #Gadchiroli #Wardha

Sakal Media Group is the largest independently owned Medi

Share This Video


Download

  
Report form
RELATED VIDEOS