नागपूर : शहरात कोरोना बाधितांची संख्या गेल्या १५ दिवसांत प्रचंड वाढली आहे. माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी कोविड नियंत्रणासाठी उपाय सुचवले आहेत. लक्षणे नसलेले रुग्ण गृहविलगीकरणात राहू शकतील. पण अशा रुग्णांना समुपदेशनाची गरज आहे. व्हिडिओ कॉल करून दररोज दोन ते तीन तास रुग्णांचे समुपदेशन खासगी डॉक्टर करू शकतात, असं फडणवीस म्हणाले. तसंच राज्याचा आढावा घेतला असता एक गोष्ट लक्षात आली की, कोरोना रुग्णांसाठी जम्बो कोविड केअर सेंटर प्रभावी ठरत नाही. त्यापेक्षा लहान-लहान कोविड सेंटर उभारावे असाही सल्ला त्यांनी दिला आहे.
नागपूर : स्मार्ट सिटीअंतर्गत शहरात भूमिगत केबलचे जाळे पसरविण्यात आले असून यापुढे नागरिकांच्या घरापर्यंत त्यातूनच विविध वाहिन्यांच्या मनोरंजनाचा खजिना पोहोचणार आहे. केबल ऑपरेटर्सना यासाठी शुल्क द्यावे लागणार असून ते ठरविण्यासाठी समितीचे गठण करण्यात आले आहे.
अमरावती : कारागृह प्रशासन कैद्यांसाठी विविध प्रयोग राबवत असते. असाच एक प्रयोग अमरावती कारागृहातही राबविण्यात आला आहे. चार महिन्यांपासून अथक प्रयत्न करून बंदींनी तब्बल ५०० गणेशमूर्ती तयार केल्या आहेत. जवळपास दहा बंदी यासाठी अहोरात्र मेहनत करत होते. शाडू मातीपासून या मूर्ती तयार करण्यात आल्या आहेत. आकर्षक रंगसंगती, रेखीव कलाकुसर असलेल्या या घरगुती मूर्तींची किंमत ७०० ते ९०० रुपयांपर्यंत आहे.
नागपूर : गेल्या दोन महिन्यांपासून कामठी तालुका नागपूर जिल्ह्यातील कोरोनाचा `हॉटस्पॉट’ ठरला. येथील रुग्णसंख्येने एक हजारचा आकडा पार केला. दरदिवशी बाधितांची संख्या भरमसाठ वाढत असताना तालुक्यात दहशतीचे वातावरण निर्माण झाले. रुग्णसंख्या वाढीवर असताना अचानक सोमवारी कामठीवासींना आशेचा किरण दिसू लागला आहे. आज फक्त १४ रुग्ण आढळले आहेत. रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ८० टक्क्यांवर पोहोचल्यामुळे तालुका प्रशासनासह नागरिकांना सुखद दिलासा मिळाला आहे.
#Nagpur #NagpurNews #Vidarbha #VidarbhaNews #News #SakalNews #Sakal #MarathiNews #Amravati #Yavatmal #Bhandara #Gondia #Chandrapur #Gadchiroli #Wardha
Sakal Media Group is the largest independently owned Media Business in Maharashtra, India. Headquartered in Pune, Sakal operations span across newspapers, TV (SAAM TV), magazines, Internet, and Mobile. With a heritage of over 82 years Sakal Media Group Publishes the number 1 Marathi Newspaper in Maharashtra and also owns and operates its TV channel named SAAM TV.