'नाम'धारी मकरंद अनासपुरे साकारणार हे व्यक्तिमत्व । अधिक माहिती करता पहा हा व्हिडियो
नाम या संस्थेच्या मार्फत सढळ हाताने मदत करणारे व गरिबांना कर्णाच्या रूपात दिसलेले मकरंद आता वेगळ्या रंगात आणि वेगळ्या ढंगात दिसणार आहेत. 'मॅनेजमेंट गुरू’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मुंबईतील डबेवाल्यांनी जागतिक पातळीवरही आपल्या कार्याचा ठसा उमटवत जगासमोर नवा आदर्श निर्माण केला आहे. लंडनच्या प्रिन्सनेही ज्यांची दखल घेतली अशा मुंबईतील डबेवाल्यांनी आजवर भुकेल्या मुंबईकरांना वेळेवर जेवणाचा डबा पोहोचवून त्यांची क्षुधाशांती केली आहे. आता हाच डबेवाला मराठी सुपरस्टार मकरंद अनासपुरेंच्या रूपात प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
विनोदी अभिनयासोबतच आपल्या धीरगंभीर भूमिकांद्वारे कधी हसवणाऱ्या तर कधी अंतर्मुख होऊन विचार करायला लावणाऱ्या अभिनेता मकरंद अनासपुरे यांनी आजवर विविध भूमिका साकारल्या आहेत.Thank U विठ्ठला या आगामी मराठी चित्रपटात करंद मुंबईच्या डबेवाल्याच्या भूमिकेत दिसणार आहेत. एम.जी.के. प्रोडक्शनची प्रस्तुती तसेच गोवर्धन काळे, गौरव काळे व अंजली सिंग यांची निर्मिती असलेल्या या चित्रपटाचे दिग्दर्शन देवेंद्र जाधव यांनी केलं असून, या चित्रपटाची कथादेखील त्यांचीच आहे. चित्रपटाचे सहनिर्माते एम.सलीम असून पटकथा ही त्यांचीच आहे. ३ नोव्हेंबरला Thank U विठ्ठला प्रदर्शित होणार आहे