गगन महोत्रा महाराष्ट्रातल्या आय.टी. क्षेत्रामध्ये सर्वाच्या परिचयाचं असलेलं नाव. मूळचे कश्मीर येथील असलेले गगन महोत्रा आता वीस वर्षापासून महाराष्ट्रात स्थायिक झाले आहेत. पुण्यामध्ये आय.टी.चे शिक्षण घेउन गगन यांनी महाराष्ट्रमधेच आपलं करिअर करायचं ठरवलं. आयटी क्षेत्रामध्ये असणारे वेगवेगळे गैरसमज दूर करत युवकांमध्ये आयटीचे महत्त्व वाढवण्यासाठी गगन यांनी घेतलेली भूमिका महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये नोंद करण्यासारखी आहे. आज देशामध्ये आणि परदेशामध्ये असणाऱ्या अनेक देशात गगन यांनी आपल्या बुद्धिमत्तेच्या जोरावर आयटीमध्ये असणाऱ्या अनेक तरुणांना आपल्याकडे आकर्षित केले आहे. शिक्षणासाठी अनेक अडथळे दूर करण्यासाठी आपल्याला काळ, वेळ, मर्यादा याचे काही देणेघेणे नसते. आपण लोकांचे आशीर्वाद घेण्यासाठी आणि लोकांना काळाप्रमाणे साक्षर करण्यासाठी सतत पुढे आले पाहिजे. ही भूमिका घेऊन गगन यांचं काम जोरकसपणे चाललेले आहे. आजच्या 'सक्सेस पासवर्ड' या सकाळचे संपादक संदीप काळे यांच्या खास कार्यक्रमांमध्ये गगन यांचा आत्तापर्यंत एकूण सगळा प्रवास आपण पाहणार आहोत. एक तरुण मग तो क्षेत्र कुठलेही असो, त्या क्षेत्रामध्ये त्यांनी ठरवलं तर तो इतिहास निर्माण करू शकतो. हेच या 'सक्सेस पासवर्ड' प्रवासातून गगन यांनी सांगितलेले आहे. चला संदीप काळे विथ 'सक्सेस पासवर्ड या कार्यक्रमांमध्ये सहभागी होऊया.