देशामधील उत्कृष्ट अभिनेता म्हणून परिचित असलेले व्यक्तिमत्व. पाचशेपेक्षा अधिक चित्रपट, आठ ते दहा राज्यांमधील वेगवेगळया भाषांमधे काम करणारा नायक-खलनायक अशी सयाजी यांची ओळख. आता अलीकडे सयाजी यांची ओळख अभिनेतापेक्षा एक सामाजिक कार्यकर्ता व समाजभान असलेले व्यक्तिमत्त्व म्हणून होऊ घातलेली आहे. सह्याद्री देवराईच्या माध्यमातुन सयाजी यांनी झाडांच्या अनुषंगाने उभी केलेली मोहीम इतिहास होऊ पाहतेय. केवळ झाडे लावा झाडे जगवा, एवढेच नाहीतर रस्त्याच्या कडेला कापण्यात येणारी झाडे जशीच्या तशी उचलून इतर ठिकाणी लावण्याचे रेकॉर्डही सयाजी शिंदे यांच्या नावावर आहे. सयाजी हे एकमेव नाही आहेत, त्यांच्या सोबत आज राज्याच्या कानाकोपऱ्यातून तरुणाई सामाजिक कार्यकर्ते, वनीकरणात रुची असणारे अनेक माणसे, निसर्गावर भरभरून प्रेम करणार्या संघटना यांच्या समवेत आहेत. आज 'सक्सेस पासवर्ड'च्या माध्यमातुन सयाजी यांच्यासोबत सकाळचे संपादक संदीप काळे यांनी केलेली खास बातचीत आपण पाहणार आहोत. सयाजी यांचा आतापर्यंतचा प्रवास, त्यांनी केलेले सगळे काम आणि त्या कामाच्या माध्यमातुन निर्माण झालेला एक इतिहास 'सक्सेस पासवर्ड'च्या आपल्या समोर पहिल्यांदाच येत आहे. पहायला विसरू नका अभिनेता ते सामाजिक कार्यकर्ते सयाजी शिंदे यांच्यासोबत 'सक्सेस पासवर्ड विथ संदीप काळे'!