Success Password With Sandip Kale | Raju Shetti | Sakal Media |

Sakal 2022-05-07

Views 36

एक अल्पभूधारक शेतकरी, एक कार्यकर्ता, एका पक्षाचा खासदार व एका संघटनेचा सर्वेसर्वा, एका पक्षाचा संस्थापक अध्यक्ष अशा अनेक भूमिकेत काम केलेले राजू शेट्टी आज महाराष्ट्रातल्या शेतकर्‍यांच्या गळ्यातले ताईत आहेत. केवळ शेतकरीच नाहीत, तर छोट्या-छोट्या चळवळीच्या माध्यमातून, छोट्या-छोट्या संघटनेच्या माध्यमातून राजू शेट्टी यांनी महाराष्ट्रात उभे केलेले काम आज शेवटच्या घटकापर्यंत जावून पोहोचले आहे. माझ्या शेतकर्‍याला न्याय मिळाला पाहिजे, या दृष्टीने त्यांचा शासनाकडे सातत्याने पाठपुरावा असतो. एक अल्पभूधारक शेतकरी ते शेतकर्‍यांचे आघाडीचे नेते म्हणून परिचित असलेले खासदार, राजू शेट्टी यांच्या या प्रवासात आपण देखील सामील होऊ या...!
पहायला विसरू नका सकाळचे संपादक, संदीप काळे यांच्या सोबत खासदार राजू शेट्टी यांचा 'सक्सेस पासवर्ड'!

Share This Video


Download

  
Report form