गोवर्धन दराडे मराठवाड्यातील सामाजिक कार्यकर्ते. ऊसतोड कामगार ते सामाजिक कार्यकर्ते असा गोवर्धन यांचा धक्कादायक प्रवास आहे. आपले आयुष्य लोकांचे आशीर्वाद घेण्यासाठी खर्च करायचे ही धारणा मनामध्ये ठेवून गोवर्धन दराडे यांनी उभं केलेलं काम आज मराठवाड्यातल्या नव्हे तर राज्यातल्या कानाकोप-यात पोहोचवले आहे. ऊसतोड कामगारांच्या मुलांसाठी. साखर कारखान्यातील कामगारांच्या मुलांसाठी, अनाथ मुलांसाठी आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या मुलांसाठी गोवर्धन यांनी सुरू केलेल्या कामाचा एक स्वतंत्र इतिहास झाला आहे. सारख्या भागांमध्ये एवढा मोठा प्रोजेक्ट उभा राहून त्या प्रोजेक्टसाठी दिवस-रात्र झटणारे गोवर्धन आज तरुणाईच्या गळ्यातले ताईत आहेत. गोवर्धन दराडे आज सकाळचे संपादक संदीप काळे यांच्या सक्सेस पासवर्ड या खास कार्यक्रमात आपल्या भेटीसाठी आले आहेत. चला तर मग सहभागी होऊया संदीप काळे विथ गोवर्धन दराडे.
⏩ नक्की बघा 'सक्सेस पासवर्ड विथ संदीप काळे'