निवडणूक आयोगाने शिवसेना हे नाव आणि पक्षाचं धनुष्यबाण हे चिन्ह मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि त्यांच्या गटाला दिलं आहे. शुक्रवारी संध्याकाळी हा निर्णय झाला. निवडणूक आयोगाचा हा निर्णय ठाकरे गटासाठी मोठा धक्का मानला जातो आहे. पुण्यातील एका कार्यक्रमादरम्यान शिंदे आणि ठाकरे गटातील कार्यकर्ते आमने सामने आलेले पाहायला मिळाले. पुण्यातील गांजवे चौक ते पत्रकार भवन या रस्त्यावर शिंदे गट आणि ठाकरे गट यांची एकमेकांविरोधात जोरदार घोषणाबाजी पाहायला मिळाली. दोन्ही गटांच्या महिला कार्यकर्त्याही यावेळी भिडलेल्या दिसल्या