शिवनेसा उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्यावतीने वरळीत शिवसैनिक निर्धार मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं होतं. ठाकरे गटातील सर्व प्रमुख नेते यावेळी उपस्थित होते. शिंदे गट आणि भाजपाकडून वारंवार उद्धव ठाकरेंच्या ऑनलाईन संबोधनावर टीका केली जाते. यावर ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी आपल्या शैलीतून प्रत्युत्तर दिलं आहे. मुख्यमंत्री पदाचं काही स्टेटस असतं की नाही, असं म्हणत कसबा, चिंचवड पोटनिवडणुकीच्या प्रचाराचा दाखला अंधारेंनी दिला. तर आपला नेता एका ठिकाणी बसून आदेश देईल व ते आम्ही मानू असा निर्धार आपण केल्याचं देखील अंधारेंनी सांगितलं.