नागपूर : राष्ट्रसंत तुकडोजी महाराज विद्यापीठाचे प्रभारी प्र-कुलगुरू डॉ. सुभाष रामभाऊ चौधरी यांची विद्यापीठाचे कुलगुरूपदी नियुक्ती करण्यात आली आहे. राज्यपाल आणि कुलपती भगतसिंह कोश्यारी यांनी आज (शनिवार) जे.डी. अभियांत्रिकी व व्यवस्थापन महाविद्यालय, नागपूरचे प्राचार्य असलेल्या डॉ सुभाष चौधरी यांच्या नियुक्तीची घोषणा केली. विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. सिद्धार्थविनायक काणे यांचा कार्यकाळ दिनांक ७ एप्रिल रोजी संपल्यामुळे हे पद रिक्त झाले होते.
नागपूर : सावकाराच्या जाचाला कंटाळून कुही तालुक्यातील खलासना गावातील प्रमोद आबाजी मोंढे (वय ४५) या अल्पभूधारक तरुण शेतकऱ्याने शेतातच गळफास घेऊन आत्महत्या केली. त्याने खाजगी सावकाराकडून कर्ज घेतले होते. परंतु, वेळेत परतफेड करता आली नाही. त्यामुळे सावकाराने चक्रवाढ पद्धतीने व्याज लावून शेतजमीन आपल्या नावे करून बळाकवली. दोन लाखाचे कर्ज दहा लाखाच्या घरात गेले होते. एवढी रक्कम परफेड करणे शक्य नसल्याने तो अनेक दिवसांपासून तणावात होता. त्यामुळे गळफास घेऊन जीवन संपवण्याचा टोकाचा निर्णय त्याने घेतला. यामुळे त्याची पत्नी आणि दोन लहान मुले यांच्यावर आभाळच कोसळले आहे.
नागपूर : गेल्यावर्षी व्याघ्र दिनानिमित्त २०१८ साली झालेल्या व्याघ्रगणनेनुसार वाघांची आकडेवारी जाहीर केली होती. त्यात देशात २९६७ तर महाराष्ट्रात ३१२ वाघ असल्याचे घोषित केले होते. राज्यातील व्याघ्र प्रकल्प, अभयारण्य आणि संरक्षित क्षेत्राबाहेरील वाघांची तपशीलवार माहिती तब्बल एका वर्षानंतर पुढे आली आहे. त्यात राज्यातील सहा व्याघ्र प्रकल्पात १८८, तर चार विभागातील संरक्षित क्षेत्राबाहेर १०७ वाघ असल्याचे उघड झाले आहे.
गडचिरोली : अनेक कारणांनी प्रारंभापासूनच वादग्रस्त ठरलेल्या गोंडवाना विद्यापीठाच्या प्राध्यापक भरती प्रक्रियेला तूर्त स्थगिती देण्यात आली आहे. विद्यापीठ प्रशासनाने यासंदर्भात गुरुवार (ता.६) सूचना निर्गमित केली आहे.
भंडारा : भंडारा-गोंदीयाचे खासदार सुनील मेंढे विदर्भ हाऊसिंग कॉलनीमधील लुक्स सलुनमध्ये दाढी-कटींग करीत होते. तेवढ्यात काही लोकं तेथे आले आणि त्यांना बघून काहीही न बोलता खासदारांनी चक्क तेथून पळ काढला. कारण ती वेळ होती रात्री ११ वाजताची. सायं