#Shorts
#DailyYoga
आजचे आसन : वृक्षासन
वृक्षासन कसे करावे?
जमिनीवर सरळ सावधान स्थितीत उभे राहा. आता उजवा पाय उचलून तो गुडघ्यात वाकवून त्या पायाचे पाऊल डाव्या मांडीच्या खाली आणि गुडघ्याच्या वर ठेवावे. अशा स्थितीत ताठ उभे राहावे. या स्थितीत डावा पाय ताठ ठेवावा आणि त्यावर शरीराचा तोल सांभाळावा. शरीर स्थिर झाल्यावर दीर्घ श्वास घेत हळूहळू दोन्ही हात डोक्यावर न्यावेत. दोन्ही हातांनी नमस्कारची मुद्रा करावी. पाठीचा कणा ताठ ठेवून श्वासावर आणि शरीराच्या स्थिरतेवर लक्ष ठेवावं. यानंतर श्वास सोडत हात खाली घ्यावेत. उजवा पाय खाली आणावा आणि आता डावा पाय उजव्या पायाच्या मांडीजवळ नेत हे आसन करावे.
वृक्षासन करण्याचे फायदे कोणते?
- शरीराची स्थिरता आणि समतोल राखणारी यंत्रणा सुधारण्यास मदत करते.
- एकाग्र आणि सतर्क राहण्याची वृत्ती वाढवते.
- खांदे आणि पाठीच्या कण्यासाठी हे उत्तम आसन आहे.
- पाय मजबूत करते आणि कमरेखालील भाग मोकळा होतो.
- श्वासोच्छवासाची क्षमता वाढवते.
- चेतातंतू आणि स्नायू यांच्यातील समन्वय वाढवण्यास मदत होते.
#sakal #yogaurja #devyanisyogaurja #yogasan #yoga #DailyYoga #saamtv #sakalmedia #reels #Dainikgomantak