#Shorts #DailyYoga आजचे आसन : वक्रासन | Sakal Media | SAAM TV | Dainik Gomantak |

Sakal 2021-07-05

Views 1

#Shorts
#DailyYoga

आजचे आसन : वक्रासन

वक्रासन करण्याचे फायदे -

१. मधुमेहींसाठी हे आसन अत्यंत फायदेशीर आहे.
२. रक्तातील साखरेचं प्रमाण नियंत्रणात राहते.
३. मानसिक स्थैर्य मिळते. मानसिक ताण कमी होतो.
४. फुफ्फुसाची कार्यक्षमता वाढते.
५. फुफ्फुसाला रक्तपुरवठा करणाऱ्या पेशींचं कार्य सुरळीत होतं.
६. शरीरातील ऑक्सिजनची पातळी वाढवते.
७.पाठीच्या मणक्याची लवचिकता वाढते.
८. पाठीचा कणा मजबूत होतो.
९. खांदेदुखी, अस्थमा आणि पचनक्रिया यांच्याशी संबंधित तक्रारी दूर होतात.
१०. एकाग्रता वाढते.

वक्रासन कसं करावं?

१. प्रथम दोन्ही पाय सरळ रेषेत ठेवून ताठ बसावं.
२. त्यानंतर उजवा पाय गुडघ्यात दुमडून डाव्या पायाच्या गुडघ्याजवळ ठेवा.
३. डावा पाय सरळ ठेवा, उजवा हात पाठीमागे ठेवा
४. हळूहळू डावा हात उचलून तो उजव्या पायाच्या घोट्याजवळ ठेवा. त्यानंतर तुमचा खांदा, मान मागे वळवून मागे पहा. किमान १० सेकंद या स्थितीत राहा आणि दुसऱ्या बाजूने हेच करा

#sakal #yogaurja #devyanisyogaurja #yogasan #yoga #DailyYoga #saamtv #sakalmedia #reels #Dainikgomantak

Share This Video


Download

  
Report form
RELATED VIDEOS