#Shorts
#DailyYoga
आजचे आसन : सर्पासन
कसं करावं सर्पासन?
प्रथम पोटावर पालथं पडून झोपावं आणि डोक्याचा स्पर्श जमिनीला करावा. त्यानंतर हात कंबरेच्या मागे नेत दोन्ही हाताची बोटं एकमेकांमध्ये गुंतवावी. यावेळी पायाचे तळवे आणि टाचा एकमेकांना जोडलेले राहतील याची काळजी घ्यावी. तसंच श्वास घेत हात मागच्या बाजूला खेचावेत आणि डोकं वरच्या बाजूला उचलावं. सोबतच मान मागे वळवत खांदे आणि छातीचा भागही उचलायचा प्रयत्न करा. कंबर मागच्या बाजूला वाकवून शरीराचा पुढचा, बेंबीपर्यंतचा भाग वर उचला. हे करताना श्वासोच्छ्वास सामान्य ठेवून जितका वेळ शक्य आहे तेवढा वेळ या स्थितीमध्ये थांबा. नंतर श्वास सोडत हळूहळू पुन्हा पूर्वस्थितीत परत या.
सर्पासन करण्याचे फायदे -
१. पाठीचा कणा, पाठीचे स्नायू आणि मनगट बळकट होण्यास मदत मिळते.
२. श्वसनयंत्रणेसाठी अत्यंत फायदेशीर
३. ओटीपोटातील स्नायू बळकट होण्यास मदत मिळते.
४. फुफ्फुसांची कार्यक्षमता वाढते.
५. पचनक्रिया सुरळीत होते.
६. रजोनिवृत्तीच्या काळात होणारा त्रास कमी होतो.
७. अस्थमा, वंधत्व, निद्रानाश आणि सायनसचा त्रास कमी होतो.
८. पोटावरील अतिरिक्त चरबी कमी होते.
९. मेंदूवर आलेला ताण, उदासीनता यांसारख्या समस्या दूर होतात.
#sakal #yogaurja #devyanisyogaurja #yogasan #yoga #DailyYoga #saamtv #sakalmedia #reels #Dainikgomantak