#Shorts
#DailyYoga
आजचे आसान : सेतुबंधासन
सेतुबंधासन या आसनाचं नाव सेतू आणि बंध या दोन शब्दांपासून बनला आहे. सेतू म्हणजे पूल आणि बंध म्हणजे बांधणे. हे आसन करताना शरीराची स्थिती ही एका पूलाप्रमाणे होते, म्हणून त्यास सेतुबंधासन असं म्हणतात.
सेतुबंधासन कसे करावे?
सर्वात प्रथम पाठीवर झोपा आणि दोन्ही हात शरीराजवळ ठेवा. यानंतर दोन्ही पाय गुडघ्यात दुमडून कमरेचा भाग वर उचलण्याचा प्रयत्न करावा. हे करताना दोन्ही हात जमिनीवरच रहावेत. कमरेचा भाग जितका शक्य होईल तितकाच वर उचलावा. सवयीनुसार आणि शरीराच्या लवचिकतेनुसार त्याची क्षमता वाढवता येईल. या स्थितीत काही सेकंदं थांबल्यानंतर पुन्हा पहिल्या स्थितीत यावे. पाठिला दुखापत झाल्यास हे आसन करणं टाळावं.
सेतुबंधासन करण्याचे फायदे
- पाठिचा कणा बळकट होतो.
- शरीराची लवचिकता वाढते.
- पचनाची प्रक्रिया सुलभ होते.
- मासिक पाळीदरम्यान होणारा त्रास कमी होतो.
- पाठदुखी, थकवा, अनिद्रा दूर होते.
#sakal #yogaurja #devyanisyogaurja #yogasan #yoga #DailyYoga #saamtv #sakalmedia #reels #Dainikgomantak