#Shorts
#DailyYoga
आजचे आसन : जानुशिरासन
जानुशिरासन करण्याचे फायदे -
१. मधुमेहींसाठी अत्यंत फायदेशीर
२. मूत्रपिंड, यकृत आणि Spleen (रक्ताच्या शुद्धतेचे नियंत्रण करणारे जठराजवळचे एक लहान इंद्रिय) यांच्या कार्याला चालना मिळते.
३. डोकेदुखी, ताण, मासिक पाळीदरम्यान आणि रजोनिवृत्तीच्या वेळी होणारा त्रास कमी होण्यास मदत मिळते.
४. बरगड्या मजबूत होतात.
५. पाठीच्या कण्याची लवचिकता वाढते.
६. बद्धकोष्ठतेचा त्रास दूर होतो आणि पचनसंस्थेचं कार्य सुरळीत होते.
७. ओटीपोटातील स्नायू, मांडी आणि पोटऱ्यांचे स्नायू बळकट होतात.
८. हृदय, फुफ्फुसे आणि मेंदू यांना होणारा रक्तपुरवठा सुरळीत होतो.
९. पाठीचे आणि मांड्यांच्या आतील भागाचे स्नायू ताणले जातात.
जानुशिरासन कसे करावे?
प्रथम जमिनीवर दोन्ही पाय पसरून बसा. आता डावा पाय गुडघ्यात दुमडून दुसऱ्या पायाच्या मांडीजवळ न्या. त्यानंतर उजव्या पायाचा अंगठा दोन्ही हाताने पकडा व डोकं जमिनीच्या दिशेने खाली वाकवून उजव्या पायाच्या गुडघ्याला टेकवण्याचा प्रयत्न करा. या स्थितीत शक्य तितका वेळ थांबा. त्यानंतर हीच कृती उजवा पाय दुमडून करा.
#sakal #yogaurja #devyanisyogaurja #yogasan #yoga #DailyYoga #saamtv #sakalmedia #reels #Dainikgomantak