News Of The Day | मध्यम वर्गासाठी खुष खबर बजेट मध्ये दिलासा मिळण्याची शक्यता | Lokmat News

Lokmat 2021-09-13

Views 0

सध्या अडीच लाख रुपये आणि त्यावर असलेल्या उत्पन्नावर आयकर भरावा लागत आहे. पण येत्या बजेटमध्ये ही मर्यादा तीन लाख रुपये करण्याचा प्रस्ताव अर्थमंत्रालयानं ठेवला असल्याचं बोललं जात आहे.हे बजेट मोदी सरकारचं शेवटचं पूर्ण बजेट असणार आहे. या बजेटमध्ये सरकार मध्यमवर्गाला दिलासा देण्याबाबत विचार करत आहे. मागच्या बजेटमध्ये आयकर स्लॅबमध्ये कोणताही बदल केला नव्हता. पण सगळ्यात शेवटच्या स्लॅबमधल्या आयकरचा दर १० टक्क्यांवरून ५ टक्क्यांवर आणण्यात आला होता. सगळ्यात शेवटच्या स्लॅबमध्ये अडीच लाख ते पाच लाख रुपयांपर्यंत कमाई करणारे येतात.याचबरोबर पाच ते दहा लाख रुपये कमाई असणाऱ्यांना १० टक्के, १० ते २० लाख रुपये कमाई असणाऱ्यांना २० टक्के आणि २० लाखापेक्षा जास्त कमाई असणाऱ्यांना ३० टक्के कर लावला जाऊ शकतो.

आमच्या चैनल ला सब्सक्राइब करा https://www.youtube.com/LokmatNews

Share This Video


Download

  
Report form
RELATED VIDEOS