प्रा. डॉ. शास्त्रज्ञ श्रीनिवास औंधकर खगोलशास्त्रीय विश्वातलं सर्वांना परिचित असलेले नाव! एम. जी. एम. विद्यापीठाच्या माध्यमातून गेल्या अनेक वर्षांपासून या निसर्गाला आपला मित्र बनवत, त्याला सोबत घेऊन त्याचे अनुमान काढणारे जबरदस्त अवलिया. वैज्ञानिक दृष्टिकोनाबाबत जनसामान्यांच्या मनामध्ये घर करून, लोकांच्या विकासासाठी अत्याधुनिकतेकडे वाटचाल करण्याच्यादृष्टीने डॉ. श्रीनिवास औंधकर यांनी केलेले काम नक्कीच नोंद घेण्यासारखे आहे. चंद्र, तारे, सूर्य या सगळ्यांना आपल्या बुद्धिमत्तेच्या कक्षेतून पाहणारे डॉ. औंधकर हे महाराष्ट्रातले नामवंत शास्त्रज्ञ म्हणूनही सगळ्यांना परिचयाचे आहेत. मी औरंगाबादच्या एम. जी. एम. विद्यापीठामध्ये डॉ. औंधकर यांचे विज्ञाननिष्ठ असलेले सगळे प्रयोग जेव्हा पाहत होतो, तेव्हा माझ्या असे लक्षात आले की, आपले राज्य किती महान व्यक्तींनी समृद्ध असलेले आहे. वेगळी माहिती, जी आपल्याला कधीच माहिती नव्हती. चंद्रावर गेल्याचा भास, अगदी एका फुटाच्या अंतरावर तुम्हाला होणारे सूर्यदर्शन. पृथ्वी, चंद्र, सूर्य या सगळ्या ठिकाणी तुमचे वजन किती आहे याचे थेट मोजमाप काढणे. 'सकाळ'चे संपादक संदीप काळे यांनी आपल्या ‘सक्सेस पासवर्ड’ या खास शोच्या माध्यमातून डॉ. श्रीनिवास औंधकर यांचा सगळा प्रवास आपल्यासमोर ठेवला आहे. चला तर मग पाहूया ‘सक्सेस पासवर्ड’ विथ संदीप काळे