नागपूरसह विदर्भातील बुधवारच्या महत्त्वाच्या घडामोडी | Live Marathi News | आजच्या ठळक बातम्या |

Sakal 2021-04-28

Views 4.4K

नागपूर : भारतीय सैन्यात अधिकारी पदावरून निवृत्त झालेल्या महिलेशी एका युवकाने फेसबूकवरून मैत्री केली. महिलेचा विश्वास संपादन केला. मैत्री घट्ट झाल्यानंतर तिला वारंवार गिफ्टच्या नावाखाली आणि अन्य आमिष दाखवून ४१ लाख ७० हजार रूपयाने गंडा घातला. पैसे घेतल्यानंतरही ब्लॅकमेल करीत महिलेला बदनामीची धमकी देत होता. महिलेने सावध पवित्रा घेत पतीला सर्व हकिकत सांगून गिट्टीखदान पोलिस स्टेशनमध्ये तक्रार केली. पोलिसांनी अमेरिकन मित्राविरूध्द गुन्हा दाखल केला.

नागपूर : शहरात आता कोरोना विषाणूने उग्र रुप धारण केले आहे. जिल्हा कोरोनाग्रस्त होत असून प्रादुर्भावाची साखळी अधिक घट्ट झाली आहे. ऑगस्टच्या तुलनेत सप्टेंबरमध्ये कोरोनाचे संकट गहिरे झाले आहे. आज नागपुरात ४० जणांचा बळी जाण्यास कोरोना विषाणू कारणीभूत ठरला आहेत. तर नव्याने १५०० कोरोनाबाधितांची भर पडली. यामुळे बाधितांचा आकडा ५६ हजारावर पोहोचला आहे. तर कोरोनाच्या मृत्यूचा आकडा अठराशेजवळ पोहचला आहे.

अमरावती : आतापर्यंत आपण बाइक केवळ पेट्रोल, डिझेलवर चालताना पाहिली, पण लवकरच हवेवर चालणारी गाडी दिसली तर आश्‍चर्य वाटायला नको. या गाडीमध्ये पेट्रोल, इथेनॉल, सौरऊर्जेसह पवनऊर्जेचा पर्याय राहणार आहे. गरजेनुसार कुठलाही पर्याय असल्याने ही गाडी हवेवरसुद्धा धावणार आहे. नुकतेच अमरावतीमधील सिपना अभियांत्रिकी महाविद्यालयातील अंतिम वर्षाच्या विद्यार्थ्यांनी यासंदर्भातील पेटंट रजिस्टर केलेले आहे.

नागपूर : मंदीरात गेल्याबरोबर घंटानाद करण्याची परंपरा हिंदू संस्कृतीत आहे. मात्र सध्या मंदिरे बंद असल्याने घंटानादापासून भक्त वंचित आहेत. त्यावर एका परम भक्ताने उपाय शोधून काढला आहे. सेंसर समोर हात नेला असता मंदीरात घंटानाद होतो. नागपुरात केवळ सेंसरवर घंटानादाची सोय असलेले हे पहिलेच मंदिर आहे.

गोंदिया : तालुक्‍यातील नवरगावजवळील नदीच्या कडेला असलेल्या जंगलात जुगार सुरू असल्याची माहिती होताच स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने छापा टाकला. पोलिसांना पाहून काही जुगाऱ्यांनी नदीत उड्या टाकल्या. त्यापाठोपाठ पोलिसांनीदेखील नदीत उड्या टाकून जुगाऱ्यांना ताब्यात घेतले. काहींना जंगलात पाठलाग करून पकडले. ही कारवाई सोमवारी सायंकाळी पाचच्या सुमार?

Share This Video


Download

  
Report form
RELATED VIDEOS