दरवर्षी दसऱ्यानिमित्त शिवाजी पार्कवर होणारा शिवसेनेच्या दसरा मेळावा करोनामुळे यावर्षी षण्मुखानंदमध्ये भरविण्यात आला होता. दसरा मेळाव्यात उद्धव ठाकरेंनी केलेल्या भाषणाची जोरदार चर्चा सुरु आहे. त्यांनी आपल्या भाषणातून विरोधकांना टोले लगावले. भाजपा आमदार आशिष शेलार यांनी शिवसेनेच्या या दसरा मेळाव्याचं 'दशावतार' असं वर्णन करत उद्धव ठाकरेंना टोला लगावला आहे.